Ad will apear here
Next
गोडाचे पदार्थ (डेझर्ट्स), गोडाचे पदार्थ (पक्वान्न)
गोड पदार्थ फक्त सणासुदीच्या दिवशीच खावा, असा काही रिवाज नाही. अनेकांना जेवताना किंवा जेवण झाल्यावर गोडाचा घास लागतो. मग या गोड पदार्थांमध्ये विविधता असायलाच हवी. पाककलातज्ञ जयश्री कुबेर यांची ही दोन्ही पुस्तके गोडाला वाहून घेतलेली आहेत.

पहिल्या पुस्तकात नानाविध डेझर्ट्स कशी करावी याविषयी मार्गदर्शन आहे. त्यात पुडिंग्स, सुफले, मूस, रोल्स, बॉल्स, कुकीज, केक, आईस्क्रीम यांचा समावेश आहे.

दुसऱ्या पुस्तकातील पाच विभागांत विविध पक्वान्ने दिली आहेत. खीर, लापशी, रबडी हा पहिला विभाग. दुसऱ्या विभागात शिरा, तिसऱ्या विभागात लाडू, पेढे, बर्फी, वड्या, करंज्या, अनारसे यांच्या कृती आहेत.

हलवा, रोल्सचा स्वतंत्र विभाग आहे आणि मोदक, कलाकंदसारखे पदार्थही खास विभागात शिकायला मिळतात.  

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १५८
किंमत : १२० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZSLBH
Similar Posts
भात, पुलाव, बिर्याणी, रायती, स्नॅक्स (पारंपरिक) नेहमीचे पदार्थ निराळ्या स्वरूपात नि निराळ्या स्वादात समोर आले, तर जेवणाची लज्जत वाढते. असे लज्जत वाढवणारे पदार्थ पाककलातज्ज्ञ जयश्री कुबेर यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. पहिल्या पुस्तकात त्यांनी भाताच्या निरनिराळ्या पाककृती दिल्या आहेत. भात, भाताचे प्रकार, पुलाव, बिर्याणी हे सर्व व्हेज व नॉनव्हेज प्रकारात करायला शिकवले आहे
मांसाहारी पदार्थ + भात, पुलाव, बिर्याणी, रायती शरीराला उपयुक्त ठरतील असे घटक खाद्यपदार्थांमधूनच मिळाले, तर औषधे घेण्याची गरजच उरणार नाही. मांसाहार हा अशा काही घटकांचा स्त्रोत आहे. मांसाहारी पदार्थाच्या अनेक पाककृती जयश्री कुबेर यांच्या या पुस्तकातून शिकायला मिळतात. अंड्यापासून करीसारखे अन्य पदार्थ तयार करता येतात, तर चिकनपासून अनेक चमचमीत पदार्थ करता येतात, हे पुस्तकातून समजते
पराठे, पुऱ्या, रोटी, धिरडी, थालीपीठ + सूप्स, स्टार्टर्स, मॉकटेल्स, बार्बेक्यू पौष्टिक आणि पोटभरी आहार अशी पराठे, धिरडी, थालीपिठांची ओळख आहे. जयश्री कुबेर यांनी हा आहार चविष्ट नि लज्जतदार बनवला आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक जवळ ठेवले, तर रोज वेगवेगळे प्रकार केले तरी वर्षभरही नव्या चवीचे पदार्थ खायला मिळतील. पराठ्यांचे ५५ प्रकार, विविध पुऱ्या, डोसे, आंबोळी, घावन, धपाटे, फुलके, भाकरीच्या कृतीही पुस्तकात आहेत
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language